XI English 2.3 There Is Another Sky :- Marathi Translation

 2.3 There Is Another Sky :- Marathi Translation
There is Another Sky

There is another sky, 
Ever serene and fair, 
And there is another sunshine, 
Though it be darkness there; 
 Never mind faded forests, Austin, 
Never mind silent fields—
Here is a little forest, 
Whose leaf is ever green; 

Here is a brighter garden, 
Where not a frost has been; 
 In its unfading flowers 
I hear the bright bee hum: 
Prithee, my brother, 
Into my garden come! 
                                      -Emily Dickinson 

मराठी भाषांतर 
दुसरे आकाश
कवितेचा भावार्थ
    'देअर् इज् अनदर् स्काय्' ही कविता, सुनीत (सॉनेट) या चौदा चरणांच्या काव्यप्रकारात मोडते. यांत पहिले कडवे आठ ओळींचे आणि शेवटचे कडवे सहा ओळींचे असते. या कवितेतून कवयित्री एमिलि डिकिन्सन आपल्या भावाला दिलासा देऊ पाहतात की, जीवनात कितीही अंधकारमय काळ आला असला; तरी त्याला आशेचा किरण नक्की गवसेल.
     'तिथले' आणि 'इथले' या दोन विरुद्धार्थी शब्दांतून कवयित्री आपल्या भावाचे, ऑस्टिनचे जग (निराशावादी आयुष्य) आणि तिचे जग (आशावादी आयुष्य) यातील फरकांचे वर्णन करते. पहिल्या कडव्यात कवयित्री आश्वासक शब्दांत त्याला सांगते, सध्या जरी तिथले (तुझे) जीवनरूपी अरण्य वैराण, उदास आणि मूक झालेले असले, तरी इथले जीवनरूपी वन अजूनही हिरवेगार (सदाहरित) आहे. तुझ्या आकाशात आज अंधःकार भरून राहिला असला तरी, इथल्या प्रसन्न आकाशात (तुझ्यासाठी) स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला आहे.
      दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते, इथला जीवनरूपी बगिचा आनंदाने उजळून निघालेला आहे, आणि हिमवर्षावाने इथल्या हिरवाईला गोठवून टाकलेले नाही. इथे टवटवीत फुलांवर मधमाश्या गुणगुणत, रुंजी घालत आहेत. म्हणून कवयित्री इथल्या, तिच्या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तिच्या प्रिय भावाला बोलावत आहे, येण्यासाठी आर्जव करीत आहे.
:- एमिलि डिकिन्सन 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
#