2.1 Song of the Open Road:- Walt Whitman
२.१ मुक्त रस्त्याचे गाणे
एक पाउल आनंदी मनाने
मी निवडले मुक्त रस्त्याचे जिने
निरोगी,मुक्त रस्त्याची धरून वाट
जिकडे जाईन मी तीच नवी पहाट
तपकिरी (लाल) रस्ता,
मी एक फिरस्ता.
आता, चांगल्या नशिबाची मागणी नको,
नशीबवान आहे मीच आता विनवणी नको,
आता, जीवनातून दु:ख झाले बेदखल
आजचे काम आजच, नाही उद्याची चालढकल.
गुंडाळल्या घराच्या तक्रारी, वादविवाद
धिटाने, आनंदाने, गाणार मुक्त रस्त्याचा संवाद.
पुरेशी आहे ही वाट आणि वसुंधरा
नको दडपण, नको प्रभाव आणि खोटा पसारा
असू दे त्यांना तिथेच त्यांच्याच अंमलात
मी आहे स्वातंत्र्याचे गाणे गात.
(प्रवास मुक्त रस्त्याच जरी केला एकला
सुख दुःखाच्या त्या आठवणीने नाही थकला
त्या सुंदर आठवणी आहेत पाठीवरी
सुटका नसे त्यातून माझी, जपल्या त्या अंतरी
परिपूर्ण करतील मला, देतील नव्या प्रवासाची उभारी......
देतील नव्या प्रवासाची उभारी......)
कवी :- walt Whitman