Grammar : Figures of Speech

 Figures of Speech

1) Alliteration:-

When in a sentence sound of any letter which comes in the beginning of the word is repeated, then there is use of alliteration.

एखाद्या वाक्यात समान आवाजा चे मुळाक्षर जर वेगवेगळ्या शब्दात सुरुवातीला पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तेथे alliteration असते.

e.g.
a) Raju brings himself to the bank of a bay.
b) He holds his head high.
c) काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापून काढले.
 
2) Repetition:-
When in a sentence same words are repeated then there is the use of repetition.

एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तेथे repetition असते.

e.g.
a) Rain, rain go away.
b) Alone, alone, all, alone.
c) देवा हो देवा गणपती देवा.

3) Personification:-
When in a sentence lifeless (inanimate) objects, animals, birds, plants, flowers etc. are given the human qualities or they are described as human beings then there is use of personification.

एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादींना मानवी गूण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखे वागतांना दाखवलेले असते तेव्हा तेथे personification असते.

e.g.
a) The waves are singing a song.
b) Stars danced in the sky.
c) ती पहा सर्वात मागे मान उंचावून पाहणारी टेकडी. तिच्या पायाजवळून उड्या मारीत जाणारा, गात जाणारा तो अवखळ झरा.

4) Simile:-
When in a sentence a direct comparison is made between two objects of different kinds which have at least one point in common shown using 'like' or 'as' then there is use of simile.

एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ति, प्राणी, गुणवैशिष्टे, किंमत, महत्व इत्यादीची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी like किंवा as यांचा उपयोग केलेला असतो तेव्हा तेथे simile असते.

e.g.
1) Kashmir is like a heaven of India.
2) The road lies like the shaped carpet.
3) शिवाजी महाराज सिंहासारखे होते.

5) Metaphor:-
When an indirect comparison is made in between two objects of different kinds which have at least one point in common then there is use of metaphor. There is no use of words 'like' and 'as'.

एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू व्यक्ति, प्राणी, गुणवैशिष्टे, किंमत, महत्व इत्यादींची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी like किंवा as यांचा उपयोग केलेला नसतो तेव्हा तेथे metaphor असते.

e.g.
1) Seeds of moonlight.
2) The camel is the ship of the desert.
3) शिवाजी महाराज सिंह होते.

6) Onomatopoeia:-
When in a sentence a word itself expresses sound then there is use of onomatopoeia.

जर दिलेल्या वाक्यात आवाज दर्शक शब्द वापरलेले असतील तर तेथे onomatopoeia असते.

e.g.
1) The dog's bhoo bhoo is creating noise.
2) The twittering of tiny birds.
3) झुक झुक झुक झुक आगीनगाडी

7) Inversion:-
When in a sentence words are not in a correct prose order i.e. (S + V + O) then there is use of inversion.

जर दिलेल्या वाक्यात कर्ता + क्रियापद + कर्म अशी रचना न देता ती यमक जुळवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी वेगळी दिलेली असते तेव्हा तेथे inversion असते.

e.g.
1) But don't you quit.
2) In vain is the world play.
3) हम आपके है कौन.

8) Hyperbole:-
When in a sentence a statement is made emphatic by over-statement or exaggeration then there is use of hyperbole.

जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल तर तेथे hyperbole असते.

e.g.
1) She wept a bucket full of tears.
2) I will bring for you the stars and moon if you wish.
3) दमडीच तेल आणले. त्यात सासुबाईंची आंघोळ झाली उरलेले तेल सांडले, ते वेशीपर्यंत वाहत गेले. त्यात उट पोहून गेला.

9) Antithesis:-
When in a sentence the opposite words or ideas are used side by side then there is use of antithesis.

जर वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तेथे antithesis असते.

e.g.
1) He wants to light the dark route.
2) It may be near when it seems afar.
3) उघडलेली खिडकी त्याने बंद केली.

10) Climax:-
When in a sentence ideas, thoughts, value, importance, qualities etc. are arranged in ascending order then there is use of climax.

जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्व, गुणवैशिष्टे इत्यादी चढत्या क्रमाने दिलेले असतील तर तेथे climax असते.

e.g.
1) She came, she saw, she conquered.
2) They enjoy liquor with dance and drums.
3) ती आली, तिने पाहीले आणि तिने जिंकून घेतले.

11) Anti-climax:-
When in a sentence ideas are presented in descending order then there is use of anti- climax.

जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत. महत्व. गुणवैशिष्टे इत्यादी उतरत्या क्रमाने दिलेले असतील तर तेथे anti-climax असते.

e.g.
1) The soldier fights for glory and a shilling a day.
2) He swears before sun, moon and leaves.
3) जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ आली.

12) Transfer Epithet:-
When in a sentence one adjective is transferred from its suitable noun to another noun then there is use of transferred epithet.

जर दिलेल्या वाक्यात एखाद्या नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा तेथे transferred epithet असते.

e.g.
1) I passed three sleepless nights.
2) Veena shook her doubtful curls.
3) कर्णाचे उदार हात.

13) Paradox:-
When in a sentence self-contradictory statements are made then there is use of paradox.

जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर तेथे paradox असते.

e.g.
1) Success is failure turned inside out.
2) Her questions found their own answers.
3) The best teacher is who teaches least.
4) जरी आंधळी मी तुला पाहते.

14) Euphemism:-
When in a sentence unpleasant facts are presented in a pleasant form then there is use of euphemism.

जर दिलेल्या वाक्यात अप्रिय, अशूभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रितीने सांगीतली तर तेथे euphemism असते.

e.g.
1) He is no more.
2) When I am gone away.
3) तो सध्या सरकारचा पाहूणचार घेत आहे.

15) Synecdoche:-
When in a sentence a part is used to designate the whole or vice versa then there is use of synecdoche.

जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरुन पूर्ण वस्तूची व्यक्तिची ठिकाणाची कल्पना येत असेल तर तेथे synecdoche असते.

e.g.
1) More hands should be employed.
2) Give us our daily bread.
3) साठ पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो.

16) Apostrophe:-
When in a sentence a direct address is made to the dead, lifeless objects, plants, animals, birds, absent persons, god etc. then there is use of apostrophe.

जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निजीव वस्तूला, मृत व्यक्तिला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्षांना, अनुपस्थित व्यक्तिला, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर तेथे apostrophe असते.

e.g.
1) O moon, give me moonlight.
2) O God, save me.
3) ने मजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.

17) Tautology:-
When in a sentence different words of same meaning are used for the sake of force then there is use of tautology.

जर दिलेल्या वाक्यात एकाच अर्थाचे विविध शब्द वापरलेले असतील तर तेथे tautology असते.

e.g.
1) I have seen it with my own eyes.
2) I want to hear fairy tales and stories from him.
3) पाण्याची वॉटर बॅग, तो दमलेला थकलेला आहे.

18) Irony:-
When in a sentence two opposite ideas or sentiments are put to ridicule then there is use of irony.

जर दिलेल्या वाक्यात व्यंग दर्शविण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना एकत्र मांडलेल्या असतील तर तेथे irony असते.

e.g.
1) Young enough to live, hee!
2) Wisdom shall die with you.
3) He is thief but an honest man.
4) The house is lovely but it has no fresh air.
5) माझ्यासारखा ३५ टक्यांनी पास होणारा विद्यार्थी येथे असतांना काय काळजी करता.

19) Pun:-
When in a sentence a word is used with two meanings then there is use of pun.

जर दिलेल्या वाक्यात एखाद्या शब्दातून दोन दोन अर्थ निघत असतील तर तेथे pun असते.

e.g.
1) His knowledge of sound is not sound.
2) An ambassador is an honest man who lies abroad for the good of his country.
3) आम्ही बि घडलो तुम्ही बि घडा.

20) Interrogation:-
When a question is used instead of a statement for emphasis then there is use of interrogation.

जर दिलेल्या वाक्यात प्रश्न दिलेला असेल तर तेथे interrogation असते.

e.g.
1) Do you think a great city endures?
2) Can two and two ever make five?
3) मी कोण आहे कोणी मला सांगेल का?

21) Exclamation:-
When in a sentence there is expression of strong feelings then there is use of exclamation.

जर दिलेल्या वाक्यात उद्गार दिलेला असेल तर तेथे exclamation असते.

e.g.
1) Now all has become history!
2) What a piece of work man is!
3) देवा काय तुझा चमत्कार !

22) Metonymy:-
When in a sentence there is association of two objects and one object is described as another then there is use of metonymy.

जर दिलेल्या वाक्यात दोन वस्तूंमधील सहसंबंध दिलेला असेल आणि एका वस्तूला दुसरी वस्तूचे रुप दिलेले असेल तर तेथे metonymy असते.

e.g.
1) The pen is mightier than the sword.
2) How close he was to the golden crown.
3) तो तर माझा डावा हात आहे.

23) Oxymoron:-
When in a sentence two words of opposite meanings of same person or thing are placed side by side then there is use of oxymoron.

जर एखाद्या वाक्यात एकाच व्यक्ती किंवा वस्तू विषयी दोन विरुद्ध अर्थाचे शब्द दिलेले असतील तर तेथे oxymoron असते.

e.g.
1) It's an open secret.
2) She was found missing
3) तो स्पष्टपणे गोंधळलेला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
#